जागतिक बिकिनी दिन
*५ जुलै* *जागतिक बिकिनी डे* आज जागतिक बिकिनी डे (World Bikini Day). बिकिनी प्रथम घातली गेली ती ५ जुलै १९४६ या दिवशी. पण तिची क्रेझ आणि हॉटनेस वाढत गेला हे सत्य. पूर्वी स्विमिंग पूल पुरती मर्यादित असलेली ही आरामदायी बिकिनी आता खेळ, मैदान तसेच सौंदर्य स्पर्धात मधूनही मोठ्या दिमाखाने मिरविली जात आहे, तसेच व्हिएतनाम मधील सर्वात स्वस्त म्हणून ओळखली जाणारी Vietjet कंपनीची विमानसेवा जगभरात ‘बिकिनी एअरलाइन्स’ म्हणूनही ओळखली जाते. इ.स.पूर्व ५६०० मध्येच बिकिनी शैलीतील महिलांच्या कपड्यांचे पुरावे सापडले आहेत. रोमन कालखंडात काही महिलांनी बिकिनी सारखे कपडे परिधान केल्याची काही उदाहरणं इतिहासात पाहायला मिळतात. त्यावेळेस होणाऱ्या काही खास एथलेटिक इव्हेंट मध्ये महिलांनी असे कपडे परिधान केल्याचं पाहायला मिळतं. मात्र 'बिकिनी' फॅशन ही सर्वार्थाने नावारुपाला आली किंवा उदयास आली ती दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. त्याचं असं झालं की, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेत सन बाथची फॅशन आली होती. अमेरिका विचारांनी आता जेवढा पुढारलेला देश आहे, साहजिकच तेंव्हा तेवढा पुढारलेला नव्हता. अशातही अमेरिकेत त्यावेळ...