रेखाचा वाढदिवस
*आज*
*१० ऑक्टोबर*
*अभिनेत्री रेखाचा वाढदिवस*
बॉलीवूड चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री रेखाने आपल्या दिलकश अंदाजात, चमकत्या सौंदर्यासोबत आणि दमदार अभिनयाच्या जोरावर या इंडस्ट्रीवर अनेक दशके अधिराज्य गाजवलं. अभिनेत्री रेखा वयाच्या ६७ व्या वर्षी इतक्या सुंदर आहेत की, चेहऱ्यावरील चमक आणि तेज पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. केवळ १४ वर्षांची असताना रेखा यांनी चित्रपटामध्ये काम करणं सुरू केलं होतं. रेखा बॉलीवूडच्या मोठ्या सुपरस्टार राहिल्या आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये एकापेक्षा एक उत्तम चित्रपट दिले आहेत. रेखा यांचं आयुष्य बालपणापासूनच संघर्षाने भरलेला होता. रेखा यांना त्यांच्या अगदी साधा लूक आणि साध्या लाईफस्टाईलमुळे चित्रपटांतून रिजेक्ट करण्यात आलं होतं. त्या दिसायला सावळ्या असल्याने देखील त्यांना चित्रपट नाकारण्यात आले होते,
बॉलीवूड अभिनेत्री रेखा हिंदी चित्रपटांतील एव्हरग्रीन अभिनेत्री आहे. खूप सुंदर आणि या लोकप्रिय अभिनेत्रीने एकेकाळी १८० चित्रपटांमध्ये काम केलं. रेखा आपल्या चित्रपटांसोबत वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत होती.
*रेखा म्हणजे फक्त रेखाच*
रेखा... जोहरा अप्रतिम होती !
रेखा... उमराव जान बेहद सुंदर !
रेखा... सिलसिला मधे चाँदनी !
रेखा... नटवरलालची शन्नो !
रेखा... सुहाग मधली बसंती!
रेखा... घर मधली आरती !
रेखा... आस्था मधे मानसी !
रेखा... खूबसूरत मधे मंजू !
रेखा... झूठी मधे कल्पना !
रेखा... इजाजत मधली सुधा !
रेखा... उत्सव मधे वसंतसेना !
रेखा... कलयुग मधे सुप्रिया !
रेखा... यात्रा मधे लाजवंती !
रेखा... नमक हराम मधे श्यामा !
रेखा... गंगा की सौगंध मधे धनिया !
रेखा... दो अंजाने मधे रेखा रॉय आणि सुनिता देवी !
किती आठवायचं !
रेखा म्हणजे...
'सलाम-ए-इश्क' म्हणत जीव लावणारी...
'इन आँखो की मस्ती में' म्हणत डोळ्यात विरघळवून टाकणारी...
'तेरे बिना जिया जाये ना' अशी कबूली देणारी...
'आज कल पाँव जमीं पर नही पडते मेरे' म्हणत आपल्यातच मश्गुल होऊन राहणारी...
'परदेसिया' म्हणत अवखळपणे हुंदडणारी...
'रंग बरसे भीगे चुनरवाली' म्हणल्यावर कावरी बावरी होऊन छानशी लाजणारी...
'दिल चीज क्या हैं आप मेरी जान लीजीये' म्हणत विनंती करणारी...
'गुम हैं किसी के प्यार में दिल सुबह शाम' म्हणत रामपूर का लक्ष्मणला खुळं करणारी...
'तुमने किसी से कभी प्यार किया हैं' असा सवाल करणारी...
'सुन सुन सुन दिदी तेरे लिये इक रिश्ता आया हैं' म्हणत बहिणीच्या आनंदात सामील होणारी...
'आज इम्तिहान हैं' म्हणणारी...
'कतरा कतरा मिलती हैं, कतरा कतरा जीने दो' असं सांगणारी...
रेखा !
'सिलसिला'तली चाँदनी तर वेडं करतेय अजूनही. 'उमराव जान' तर डोळे स्थिरावत नाहीत अशीच ! आणि वसंतसेना तर लाजवाब !
ही सगळी एवढी का वेडी आहेत तिच्यासाठी हे तिलाही चांगलंच ठाऊक आहे. तरीपण ही बया विचारतेच आहे...
मन क्यूँ बहका रे बहका आधी रात को
बेला महका रे महका आधी रात को !
कसं सांगायचं गं बै तुला की तू आमच्यासाठी काय आहेस ते ! तुला बघता बघताच आम्ही मोठे झालो. बच्चनला तुझ्या बरोबर बघितला की काळजात कळ उठायची जी आजही तशीच येते !
कॉलेजच्या दिवसात रात्री अभ्यास सोडून बच्चन भारी की तू भारी यावर भरपूर चर्चा झाल्यात !
बच्चनची आणि तुझी केमिस्ट्री तर अफलातून मॕच झालेली. आजच्या पिढीतही तुम्हां दोघांच्याच जोडीचे दाखले समोर येतात.
बॉलीवूड मधल्या परफेक्ट पेअर असं कुणीही लिहायला बसलं की बच्चन आणि रेखा यांना बाजूला करताच येत नाही !
पण जेव्हा तुला उत्सव, खूबसूरत, घर, उमराव जान, कलयुग, यात्रा, इजा़जत अशा तुझ्या आणि फक्त तुझ्याच रोल मधे बघितले तेव्हा समजून आले की रेखा म्हणजे फक्त रेखाच ! नो ऑप्शन !
संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
नेट
Comments
Post a Comment