नारायण सुर्वे

*आज*

*पुण्यतिथी*

*कविवर्य नारायण गंगाराम सुर्वे*

(जन्म : १५ ऑक्टोबर १९२६; मृत्यू : १६ ऑगस्ट २०१०

हे मराठी भाषेतील कवी होते. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना इ.स. १९९८ चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला

"नाही सापडला खरा माणूस

मीही तरी मला अजून कुठे पुरता सापडलो,

किती वाचलेत चेहरे

किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात,

इथे सत्य एक अनुभव

बाकी हजार ग्रंथराज कोलमडून कोसळतात .“


कुसुमाग्रज सुर्वेंच्या कवितेविषयी म्हणतात,  “रोजच्या जीवनात संग्रमासाठी एक पाऊल उंबरठ्याबाहेर  ठेवणारे, प्रस्थापित  जोखड झुगारुन देणारे पण शाश्वत नितिधर्म मानणारे असे हे सांस्कृतिक सरहद्दीवरचे जग नारायण सुर्वे यांच्या कवितेत प्रथमच बोलायला लागले. कामगारांच्या जगाचा संदर्भ त्यांची कविता वाचतांना अगदीच बाजुला ठेवता येत नाही.  परंपरागत साच्यांना बळी न पडता वैशिष्ट्यपूर्ण अनुभवातून मुक्त होणे हे सुर्वे यांच्या कवितेत सतत अनुभवता येते. हे जग कामगारांचे, उपेक्षितांचे, हातावर पोट असणारांचे आहे. या जगात दैन्य आहे , दुःख आहे, सुसंस्कृत पांढरपेशांच्या दृष्टीने ते यातनामय आहे, पण ते असहाय्य नाही. ते लढाऊ आहे. प्रकाशाच्या मार्गावर झेपावणारे आहे.”


नारायण सुर्वे यांच्यावरती मार्क्सवादी विचाराचा पगडा होता ,आपल्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाची कवने लिहिली.


नारायण गंगाराम सुर्वे अनाथ मूल म्हणून वाढले. जन्म झाल्यावर जन्मदात्रीने त्यावेळी नवजात अर्भक असलेल्या नारायणास सोडून दिले. मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये कामगार म्हणून नोकरी करणारा गंगाराम कुशाजी सुर्वे व त्याची कामगार पत्‍नी काशीबाई यांनी अनाथ असलेल्या नारायणास मात्यापित्यांचे छत्र दिले. गंगाराम सुर्वे इंडिया वुलन मिलच्या स्पिनिंग खात्यात साचेवाल्याचे काम करत असे, तर काशीबाई त्याच गिरणीच्या बाइंडिंग खात्यात कामगार म्हणून नोकरी करत. हे दांपत्य मुळचे कोकणातील हेताचीवाडी(भुईबावडा) येथील होते. त्यांनी नारायणास मराठी चौथीपर्यंत शिक्षण दिले. पुढील शिक्षण नारायण सुर्वे यांनी स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केले.


गुजराण करण्यासाठी नारायण छोटेमोठे व्यवसाय करत असे. या काळात स्वतःच्या हिंमतीने तो लिहिण्या-वाचण्यास शिकला इ.स. १९६२ साली त्यांनी लिहिलेल्या कवितांचा पहिला संग्रह - "ऐसा गा मी ब्रह्म" - प्रकाशित झाला.


संकलन,शब्दांकन 

अनिल देशपांडे बार्शी

९४२३३३२२३३

Comments