*आज* *पुण्यतिथी* *कविवर्य नारायण गंगाराम सुर्वे* (जन्म : १५ ऑक्टोबर १९२६; मृत्यू : १६ ऑगस्ट २०१० हे मराठी भाषेतील कवी होते. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना इ.स. १९९८ चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला "नाही सापडला खरा माणूस मीही तरी मला अजून कुठे पुरता सापडलो, किती वाचलेत चेहरे किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात, इथे सत्य एक अनुभव बाकी हजार ग्रंथराज कोलमडून कोसळतात .“ कुसुमाग्रज सुर्वेंच्या कवितेविषयी म्हणतात, “रोजच्या जीवनात संग्रमासाठी एक पाऊल उंबरठ्याबाहेर ठेवणारे, प्रस्थापित जोखड झुगारुन देणारे पण शाश्वत नितिधर्म मानणारे असे हे सांस्कृतिक सरहद्दीवरचे जग नारायण सुर्वे यांच्या कवितेत प्रथमच बोलायला लागले. कामगारांच्या जगाचा संदर्भ त्यांची कविता वाचतांना अगदीच बाजुला ठेवता येत नाही. परंपरागत साच्यांना बळी न पडता वैशिष्ट्यपूर्ण अनुभवातून मुक्त होणे हे सुर्वे यांच्या कवितेत सतत अनुभवता येते. हे जग कामगारांचे, उपेक्षितांचे, हातावर पोट असणारांचे आहे. या जगात दैन्य आहे , दुःख आहे, सुसंस्कृत पांढरपेशांच्या दृष्टीने ते यातनामय आहे, पण ते असहाय्य नाही. ते लढाऊ आहे. प्रक...
Comments
Post a Comment