जागतिक इडली डे
*आज* *३० मार्च* *जागतिक इडली दिवस* ३० मार्च हा दिवस जगभरात जागतिक इडली दिवस म्हणून साजरा केला जातो. इडली नि सांबार हा प्रकार प्रत्येकालाच आवडतो. मुंबईत तर अगदी वडापाव प्रमाणेच इडलीवर जगणारे असंख्य लोक आहेत. सकाळी वेगवेगळ्या नाक्यावर हे इडलीवाले इडली विकत उभे असतात. या इडलीवाल्यांकडील चटणी, सांबारची एक वेगळीच चव असते. याबरोबर डाळवडा, मेदू वडा यांच्याकडे चवीने खाल्ला जातो. इडली सांबार, इडली चटणी सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. इडलीचा जेव्हा विषय येतो तेव्हा अप्रत्यक्षपणे साऊथचे म्हणजे दक्षिण भारताचे नाव समोर येते. मात्र वास्तवात इडली इंडोनेशियातून भारतात आलेली आहे. इडलीला खूप जूना इतिहास आहे. पाक शास्त्राचा अभ्यास करणार्यांच्या मते ८०० ते १२०० इ.पूर्व मध्ये भारतात इडली आली आहे. 'इडली' शब्दाची निर्मिती 'इडलीग' यापासून झाली होती. याचा उल्लेख 'कन्नड' साहित्यात आढळतो. जागतिक इडली दिवस मागच्या ३ वर्षापासून साजरा केला जात आहे. या दिवसाची सुरुवात 'एम एनियावन' यांनी केली. एम एनियावन हे 'मल्लीपू इडली' चे संस्थापक आहेत. थोरांपासून ते लहानांच्या...