Posts

Showing posts from May, 2023

भगवंत माहिती

 *आज* *श्री भगवंत प्रगट दिन* बार्शी शहर भगवंत मंदिरासाठी प्रसिध्द आहे. भगवंत मंदिर श्री विष्णुला समर्पित आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे संपूर्ण भारतात श्री विष्णुला भगवंत या नावाने ओळखले हे एकमेव मंदिर आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीची एक धार्मिक क्षेत्र म्हणून ओळख आहे. भगवंत मंदिर, कशास काशी, गया, अयोध्या जावे रामेश्वरी... असता श्रीहरी आमुचे घरी... असं बार्शीच्या भगवंताचं  आणि  त्याच्या महतीच वर्णन केलं जातं. बार्शी या नावाची उत्पत्ती होण्याची अनेक करणे सांगितली जातात. पूर्वी या गावात बारा तीर्थे होती. बारा शिवमंदिरे असल्याचा उल्लेखही पुराणात आढळतो. त्यावरून बारा शिव, बारा बारस, बारशी आणि सध्या बार्शी असं नाव प्रचलित आहे. भगवंत हा कोणत्याही नामाभिधानाशिवाय इथं स्वयंभू स्थापित आहे. गंडकी शिळेची शाळीग्राम मूर्ती पाहताक्षणीच विलोभनीय आणि लोभस वाटतं. भगवान श्री विष्णूंनी लक्ष्मीसह वास्तव्य केलेलं हे भगवंताचं मंदिर आहे. लोककथेप्रमाणे, बार्शीचा भगवंत पंढरपूरच्या विठ्ठलाहून जुना आहे ! ती कथा राजा अंबरीषास जोडली आहे. अंबरीषाची कथा ‘श्रीमद्भागवत पुराणा’च्या नवव्या स्कंधाती...